सुस्वागतम माझ्या नवीन blog वर आपले स्वागत.

Saturday, 1 October 2016

संकलित मूल्यमापन प्रथम सत्र

प्रथम सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन डाऊनलोड करण्यासाठीक्लिक  करा व आपणास हव्या त्या इयत्तेची  /विषयाची प्रश्न पत्रिका डाऊनलोड करा
     

Monday, 12 September 2016

आधार कार्ड लिंक व माहिती

[31/08, 18:00] Shobha Darekar: मित्रहो,
           सध्या विद्यार्थ्यांची आधार कार्डची माहिती online भरणे सुरू आहे. मात्र अनेक मुलांना आधार कार्ड मिळालेले नाहीत. पण त्यांच्याकडे पावती आहे. अशावेळी आपण या विद्यार्थ्यांचे आधार नंबर  online शोधू शकतो.


https://eaadhaar.uidai.gov.in/


त्यासाठी या site वर जाऊन माहिती भरा.

1.आधार पावती नंबर

2.Date with second and milisecond(  पावतीवर मिळेल.)

 3.Full name of student

4.Pin code ( पावतीवर टाकलेलाच)

5.mobile no

(  इथे तुमचा स्वतःचा किंवा कोणताही तुमच्या जवळ असलेला मोबाईल नं टाका. registration च्या वेळी दिलेला टाकणे गरजेचे नाही.यावर otp send केला जातो.)


अतिमहत्वाचे

🅰🆚
या साईटवर जे अंक भरायचे आहेत ते उलट क्रमाने भरावे लागतात. उदा. mobile no .
9623760473

असेल तर तो

3740673269

असा enter करावा लागतो. इतर अंक देखील याचप्रमाणे enter करा. मात्र नाव सरळ क्रमानेच enter करा.

अशा प्रकारे तुम्ही आधार pdf download करू शकता.

मोबाईल वर करताना Chrome किंवा Firefox वापरा.
[31/08, 18:12] Shobha Darekar: *आधार अत्यंत महत्त्वाचे*
*(पोस्ट क्रमांक 1)*
(ही पोस्ट खास माझ्या सर्व सामान्य तंत्रस्नेही शिक्षक बंधूभगिनीं साठी देत आहे)
       
                 
*आधारकार्ड Excel Files डाउनलोड करून माहिती भरण्याची पद्धत (procedure)*

▶सर्वात अगोदर Student portal वर जाऊन आपला User ID व password टाकून login करावे.

▶आता स्क्रीन वरील Excel tab ला टच करा.

▶ आता यामधील *UID Download* वर CLICK करा.

▶ *आपल्या शाळेतील वर्ग निवडा व Download वर click करा. फाईल स्क्रीन च्या खालील बाजूस डाउनलोड झालेली दिसेल.*

▶अशाच पद्धतीने आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गाच्या एक्सेल file download करुन घ्या. सर्व फाईल्स डाउनलोड करून घेतल्या की ती स्क्रीन बंद करा.

▶सर्व फाईल डाउनलोड झाल्यावर नेट डाटा बंद करावा. कारण फाईल मध्ये माहिती भरण्यासाठी नेटची गरज नाही.

▶ *ह्या Download झालेल्या file आपल्या PC किंवा laptop च्या Download फोल्डर असतात. ते फोल्डर ओपन करा.*

 ▶आता तुम्हाला ज्या वर्गाची माहिती भरायची आहे ती फाईल ओपन करा.चुकुन एखादी पट्टी आली तर त्या ठिकाणी Yes वर click करा.

▶ आता फाईल ओपन झाली आहे. वरच्या बाजूला आडव्या पिवळ्या पट्टी मध्ये *enable edit* वर click करा. हा OPTION नसेल तर नो प्रॉब्लेम.

▶आता त्या फाईल मध्ये *J हा कॉलम select करा.व right clik करा आणि यामधील *format cells* ला click करा.

▶आता यामधील *Text* ला क्लिक करा.व *ok* बटण दाबा.

▶आता आपली फाईल आधारकार्ड वरील माहिती भरण्यासाठी *ready* झाली आहे.

▶ *आता हे लक्षात घ्या की मुलाच्या आधारकार्ड वर जशी माहिती असेल ती तशीच भरा. कोणत्याही परिस्थितीत दुरूस्ती वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका.*

▶ *आधार नंबर अगदी बारकाईने लक्ष देऊन भरा. एक जरी अंक चुकला तरी त्या मुलाचा आधार नंबर match होणार नाही.*

▶ *नाव लिहिताना काही मुलांचे नाव उदा. @ निलेश शिंदे  @असे असू शकते. अशा वेळी middle name मध्ये काही लिहू नका. तो रकाना blank सोडा. अगदी तुम्हाला माहित असले तरी सुद्धा.*

▶ *आधारकार्ड वर जन्मतारीख पुर्ण नोंदलेली असेल उदा. 10/05/2005 अशी असेल तरच भरा. फक्त वर्ष नोंदलेले असेल उदा. 2008 तर अशा वेळी जन्मतारीख रकान्यात काही न लिहिता तो blank सोडा.*

▶ *Male, female जसे आधारकार्ड वर असेल तसेच सिलेक्ट करा व नोंदवा.*


▶आता डाव्या कोपर्‍यात *File* नावावर click करा. त्यामधील त्यानंतर *save as* वर click केल्यानंतर other formats निवडा. (काही मित्रांना other formats दिसला नाही तर गडबडून जाऊ नये)

▶आता *file name* च्या ठिकाणी त्या फाईल्स चे मुळ नाव आलेले असेल.

▶ *जर मुळ नाव आलेले नसेल तर फाईल नाव ज्या रकान्यात लिहायचे आहे तेथे फक्त *U* हे अक्षर टाईप करा. लगेच खाली नावे येतात. त्यामधील *आपण ज्या वर्गाची फाईल Save as करत आहोत त्याच वर्गाचे नाव सिलेक्ट करा.* लक्षात घ्या की नावात गडबड झाली की अपलोड करताना *Error* येणार.

▶आता फाईल नेमच्या खालील रकान्यात click करा व त्यामधील *CSV Comma Delemited* वर click करा.

▶आता त्याखालीच *Save* बटनावर क्लिक करा.तुमची ही csv केलेली फाईल Download फोल्डर मध्ये दिसेल. ती अपलोड करण्यासाठी *ready* झाली आहे.

▶ *पण कोणत्याही परिस्थितीत CSV केलेली File ओपन करून बघू नका.* आहे तशीच upload करायची आहे. जर तुम्ही अनवधानाने ओपन करून पाहिली तर ती फाईल upload करताना *Error* येईल व तुमची सर्व मेहनत वाया जाईल..


🔵 *फाईल upload करण्यासाठी पद्धत* 🔵

▶पुन्हा Student portal वर जाऊन आपला User ID व password टाकून login करावे.

▶आता स्क्रीन वरील Excel tab ला टच करा. व यामधील *UID Upload* वर CLICK करा.

▶ *Browser...* ला click करून आपली फाईल ज्या ठिकाणी ठेवलेली आहे ते फोल्डर निवडा.
*File select* करा. खाली *Open* ला click करा..

▶आता file आली आहे. समोरच्या *upload* बटणावर click करा.

▶ *8 students inserted successfully* असा मेसेज आला की समजायचे आपली फाईल यशस्वीपणे अपलोड झाली. *(8च्या जागी तुम्ही जेवढ्या मुलांची आधार माहिती भरली ती संख्या दिसेल)*

▶ *अशी प्रोसेस प्रत्येक वर्गाच्या फाईलसाठी करायची आहे.*

*आपल्या आधार कामासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
      🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  राहुरी अ'नगर
      प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
            *मो. नं. 7758074275*
  🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
*(सर्व मित्रांना एक सूचना करावीशी वाटते की ही पोस्ट नाव कट न करता forward करावी. नाव कट करून पाठवले तर मित्रांना ज्या शंका येतील त्याचे निरसन होऊ शकणार नाही)*
[31/08, 18:12] Shobha Darekar: *आधार फाईल भरतांना व अपलोड करताना घ्यायची काळजी*
*(पोस्ट क्रमांक 2)*
        (मित्रांनो पोस्ट काळजीपूर्वक वाचा.)

▶  *save as करताना फाईल नाव सोप्या पद्धतीने कसे घ्यावे?*

*उत्तर* - अगदी सोपे आहे. फाईल नाव ज्या रकान्यात लिहायचे आहे तेथे फक्त *U* हे अक्षर टाईप करा. लगेच खाली नावे येतात. त्यामधील *आपण ज्या वर्गाची फाईल Save as करत आहोत त्याच वर्गाचे नाव सिलेक्ट करा.* लक्षात घ्या की नावात गडबड झाली की अपलोड करताना *Error* येणार.

▶ *मित्रांनो फाईल अपलोड करताना अनेकदा Error येत आहे. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी?*

 *मित्रांनो आधार फाईल्स अपलोड Error चे प्रमाण खूप वाढले आहे. अशा वेळी आपल्याला संपूर्ण माहिती पुन्हा नव्याने भरावी लागते आणि यामध्ये आपल्याला प्रचंड मनस्ताप होतो. सर्वच डाटा पुन्हा भरणे सोपी गोष्ट नाही.*
    *तसेच अनेकदा वर्गात जर जास्त मुले असतील तर सर्व मुलांची माहिती एकाच वेळी भरणे शक्य होणार नाही अशा वेळी जेवढ्या मुलांची माहिती भराल त्यावेळी फाईल नेहमीच्या साध्या पद्धतीने Save करा. (save as नाही बरं का) त्यानंतर पुन्हा पुढच्या वेळी राहिलेली माहिती भरा. सर्व माहिती भरल्यानंतर परत एकदा साध्या पद्धतीने Save करा.*
    *आता सर्वात महत्वाची गोष्ट करायची आहे. तुमची फाईल ज्या फोल्डर मध्ये आहे. तिथे या आणि आपण साध्या पद्धतीने Save करून ठेवलेल्या फाईल copy करा आणि PC, Laptop च्या दुसर्‍या Drive मध्ये किंवा pendrive यामध्ये paste करून घ्या. म्हणजे आपला भरलेला डाटा 100% सुरक्षित झाला.*
     *हे केल्यानंतर आता आपण भरलेली मूळ फाईल ओपन करा. आणि ही फाईल Save as करून csv comma delimited मध्ये CONVERT करा.*
         *अशी प्रोसेस केल्याने जरी फाईल अपलोड केल्यानंतर Error आला तरी दुरूस्ती करण्यासाठी आपल्याला सर्व माहिती पुन्हा नव्याने भरायची गरज लागणार नाही कारण ही फाईल आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली आहे.*
     *Error आला की काय चुकले ते दुरूस्त करावे लागेल. मग आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली फाईल उघडा आणि दुरूस्ती करून Save as ची प्रोसेस करून फाईल पून्हा अपलोड करा.*
   🔵*हे सर्व करताना घ्यायची काळजी*🔵
*फाईल Error आली की आपल्याला दुरूस्ती करायची आहे. ही करताना आपण त्या वर्गाची अगोदर csv केलेली फाईल delete करून टाका आणि मगच दुसरीकडे Save करून ठेवलेल्या फाईल मध्ये नवीन दुरुस्ती करा.आणि नवी फाईल अपलोड करुन टाका.*

▶ *file upload केल्यानंतर longer file name असा error आला तर काय करावे?*

*उत्तर* - असा Error आलेली फाईल ज्या फोल्डर मध्ये ठेवली आहे ते फोल्डर ओपन करा. आपली फाईल कोठे आहे ते बघा. त्या फाईल च्या नावावर Right click करा. आणि नावात थोडा बदल करा. *लक्षात ठेवा की हे पूर्ण नांव delete करायचे नाही. फक्त त्यातील काही भाग कट करुन छोटे करायचे आहे.*
    उदा. पूर्वी चे 2री च्या वर्गाच्या फाईलचे नाव *UID27260607202_02_0_(3)* असे आहे तर यामध्ये बदल कसा केला ते खाली बघा.
*UID27260607202_02_0*
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की *शून्याच्या पुढे काहीच ठेवायचे नाही.* आता Enter दाबा. फाईल्स चे नाव ओके होईल. आता ही फाईल अपलोड करा.

▶ *आधारकार्ड Excel file download करताना शाळेतील काही वर्गाच्या तुकडीतील मुलांची नावे येत नाही अशा वेळी काय करावे?*

*उत्तर* -  मित्रांनो तुमच्या शाळेत समजा मागील वर्षी 3 री च्या A व B अशा 2 तुकड्या होत्या व 4 थी ची 1 च तुकडी होती. अशा वेळी 3री मधील मुले 4थी ला आली. पण सरल रेकॉर्ड ला तर 4थी ची एकच तुकडी कार्यरत असल्याने मागील एकाच तुकडीतील मुले फक्त A तुकडीत दिसतात. पण 4 थी ची B तुकडी सरलला नोंदणी केलेली नसल्याने मागील 3री B मधील मुले मुले कोठेच दिसत नाही व आधार डाउनलोड फाईल मध्ये सुद्धा येत नाही.
    म्हणून अशा वेळी आपल्याला 4थी च्या B तुकडीची सरल मध्ये अॉनलाईन निर्मिती करावी लागणार आहे. याची प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.
1) Student portal open ला लॉगिन करा.
2) Master tab मधून division निवडा.
3) Standard 4 थी निवडा.
4) तुकडी टाकताना *B* न विसरता टाका.
यामधील बाकी सर्व माहिती सिलेक्ट करा. शेवटी सध्याच्या B तुकडीतील मुलांची संख्या टाका व खालील *Add* बटनाला  क्लिक करा. *Successfully* असा मेसेज येईल.
       आता तुमची 4थी ची B तुकडी तयार झाली. ही माहिती अपडेट होण्यास थोडा वेळ लागेल. *नंतर आपोआप मागील वर्षीच्या 3री B तुकडीची मुले 4थी B तुकडीत येतील.* व आधार Excel डाउनलोड फाईल मध्ये पण मुले येतील.
▶ *आपल्या आधार कामासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
      राहुरी 🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  राहुरी अ'नगर
      प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
            *मो. नं. 7758074275*
  🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵

[31/08, 18:12] Shobha Darekar: *आधारकार्ड माहिती शंका आणि समाधान*
*(पोस्ट क्रमांक 3)*
(पोस्ट मोठी आहे पण काळजीपूर्वक वाचा. आपल्या शंकांचे निरसन होईल. आणि योग्य वाटली तर नक्कीच इतर अनेक ग्रुपवर शेअर करा. )
 
▶ *डाउनलोड केलेल्या फाईल मधील सर्वच मुलांचे आधारकार्ड उपलब्ध नसेल तर काय करावे*

➡ *उत्तर*- सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की आपल्याला 100% मुलांचे आधार माहिती भरायची आहे. पण जर काही कारणाने सर्वच मुलांची आधार माहिती उपलब्ध नसेल तर जेवढ्या मुलांची माहिती उपलब्ध आहे तेवढ्या मुलांची माहिती भरून ती फाईल लगेच अपलोड करावी. त्यानंतर राहिलेल्या मुलांची माहिती जमा करावी. आणि पुन्हा एकदा फाईल डाउनलोड करून पुन्हा राहिलेल्या मुलांची माहिती भरण्यासाठी हीच प्रोसेस परत एकदा करायची आहे.

▶ *मागील वर्षी आधार नंबर बरोबर असलेल्या मुलांची माहिती कोठे पाहावी*

➡  *उत्तर* - Student portal open केल्यानंतर Report tab मधील HM Level दिसते. त्यातील Adhar Report ला click करा.यामध्ये  All Adhar निवडा. आता तुम्हाला ज्या वर्गाची माहिती पाहायची आहे तो वर्ग टाका. तुकडी निवडा. खालील Show report ला click करा.*
       आता तुम्हाला तुमच्या वर्गातील सर्व मुले दिसतात. ज्या मुलांच्या पुढे valid Adhar असे दिसते. अशा मुलांचे आधार नंबर योग्य आहे हे आपल्याला कळेल.

▶ *आधार च्या डाउनलोड केलेल्या Excel file मध्ये पटसंख्येपेक्षा मुले कमी का दिसतात?*

➡  *उत्तर* - मागील वर्षी आपण मुलांची माहिती भरलेली होती. त्यामधील काही मुलांचे आधार नंबर valid (म्हणजे बरोबर) झालेले होते. ज्या मुलांचे आधार नंबर बरोबर आहेत अशा मुलांची नावे परत आधार नंबर भरण्यासाठी येणार नाहीत. म्हणून मुलांची नावे कमी दिसतात.

▶ *आणि आधार डाउनलोड फाईल मध्ये जर मुले कमी दिसत असली तर काय करावे?*

➡  *उत्तर* - मुले कमी दिसत असली तरी आपण त्याठिकाणी वाढीव मुले अॅड करू शकत नाही. म्हणून डाउनलोड फाईल मध्ये जे मुलं दिसत असतील तेवढ्या मुलांची आधार माहिती भरून फाईल अपलोड करुन टाका.

▶ *file upload केल्यानंतर longer file name असा error आला तर काय करावे*

➡  *उत्तर* - असा Error आलेली फाईल ज्या फोल्डर मध्ये ठेवली आहे ते फोल्डर ओपन करा. आपली फाईल कोठे आहे ते बघा. त्या फाईल च्या नावावर Right click करा. आणि नावात थोडा बदल करा. *लक्षात ठेवा की हे पूर्ण नांव delete करायचे नाही. फक्त त्यातील काही भाग कट करुन छोटे करायचे आहे.*
    उदा. पूर्वी चे 2री च्या वर्गाच्या फाईलचे नाव UID27260607202_02_0_(3) असे आहे तर यामध्ये बदल कसा केला ते खाली बघा.
UID27260607202_02_0
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शून्याच्या पुढे काहीच ठेवायचे नाही. आता Enter दाबा. फाईल्स चे नाव ओके होईल. आता ही फाईल अपलोड करा.
 
▶ *आधारकार्ड चुकीची माहिती असली तरीही आपल्याला भरायची आहे. यामुळे आपल्या शाळेचा विद्यार्थी डाटा बदलेल का?*
                         
➡ *उत्तर* - *अजिबात बदलणार नाही.* आपण हे लक्षात घ्या की आधारकार्ड वरील जशी आहे तशी माहिती भरण्यामागे एकच उद्देश आहे की ही माहिती *UID department* कडे *Verification* साठी जाणार आहे. आपण जशी आहे तशी माहिती भरल्यामुळे आपल्या मुलांचे आधार नंबर *valid* (म्हणजे बरोबर) ठरतील. आणि *तो मुलगा किंवा मुलगी हे याच शाळेत शिक्षण घेत आहेत हे सिद्ध करणे हाच शासनाचा हेतू आहे.*

▶  *विद्यार्थी आधार माहिती भरली की ती  uid मध्ये दिसते. पण आधार रिपोर्ट मध्ये दिसत नाही यासाठी काय करावे लागेल?*

 ➡ *उत्तर* - आपण भरलेली माहिती ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर *UID department कडे Verification साठी जाणार आहे.* त्यांच्याकडून *Verification* झाल्यानंतरच त्याचा *Report* आधार रिपोर्ट मध्ये येईल. यासाठी मोठा कालावधी लागतो. म्हणून *आपण भरलेली माहिती लगेच आधार रिपोर्ट मध्ये येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला ही माहिती UID Details मधून दिसते.*

▶ *आपल्या आधार कामासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
      🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  राहुरी अ'नगर
      प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
            *मो. नं. 7758074275*
  🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵

[31/08, 18:12] Shobha Darekar: *आपण भरलेली आधार माहिती कोठे पाहावी*
*(पोस्ट क्रमांक 4)*
        🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
*आधारकार्ड Excel Files अपलोड केल्यानंतर भरलेली माहिती पाहण्यासाठी पद्धत (procedure)*

     *मित्रांनो आपण वेबसाईटवर आधार माहिती भरल्यानंतर सर्वसाधारणपणे ही माहिती सरल सिस्टीम ला अपडेट होण्यासाठी काही वेळ लागत असतो.*
    *वेबसाइट ला लोड नसेल तर ही माहिती लगेचच अपडेट होते. व आपण लगेच पाहू शकतो. पण काही वेळा ही माहिती अपडेट होण्यासाठी 24 तासही लागू शकतात.*
                           *पद्धत*
▶ *सर्वात अगोदर https://student.maharashtra.gov.in वर जाऊन (ही वेबसाईट लगेच ओपन होते) आपला User ID व password टाकून login करावे.*

▶ *आता स्क्रीन वरील Report tab ला टच करा.*

▶ आता यामधील HM LEVEL मधील *UID Details* वर CLICK करा.

▶ *आपल्या शाळेतील ज्या वर्गाची आपण माहिती पाहणार आहोत तो वर्ग निवडा व Go ला click करा. थोडा वेळ लागेल. भरलेली माहिती स्क्रीनवर दिसेल.*

▶ *अशाच पद्धतीने आपल्या शाळेतील आपण आधार माहिती अपलोड केलेल्या प्रत्येक वर्गाची माहिती तपासून बघा.*

*आपल्या आधार कामासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
      🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  राहुरी अ'नगर
      प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
            *मो. नं. 7758074275*
  🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
[31/08, 18:12] Shobha Darekar: 🔵 *आधार माहिती बाबत आज शेवटची पोस्ट*🔵
*(पोस्ट क्रमांक 5)*
*(काळजीपूर्वक वाचा. आवडली तर दुसर्‍या ग्रुपवर नक्कीच शेअर करा.)*
     🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 *आपलाच तंत्रस्नेही मित्र* 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  *राहुरी अ'नगर*
      *प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख*
           🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
 *मित्रांनो नमस्कार*
        *मित्रांनो गेल्या 10 दिवसात आपल्या सर्व शिक्षक बंधूभगिनींना आधारकार्ड माहिती सहज सोप्या पद्धतीने भरता यावी यासाठी मी 5 पोस्ट टाकल्या. या पोस्टचा उद्देश एकच होता की माझ्या बांधवांना आधार माहिती भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये.*
         *मित्रांनो या पोस्ट संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या. आणि मेसेज, फोनच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येने प्रतिक्रिया मला मिळाल्या. यामध्ये सहज सुलभतेने माहिती भरता आली यापासून तर अनेक अडचणी कशा दूर कराव्यात अशा प्रतिक्रियांचा त्यामध्ये समावेश होता.*
         *मित्रांनो मी तुमच्यासारखाच एक साधा शिक्षक आहे. माझ्या परीने मी एक साधा प्रयत्न केला. त्याला एवढा प्रतिसाद मिळेल याची कल्पनाही मी केली नव्हती. मित्रांनो या पोस्ट ने गेल्या 10 दिवसात मला प्रचंड संख्येने फोन केला आले. माझ्या परीने शक्य होईल तेव्हा या फोन कॉल्स ला उत्तरे दिली. माझ्या पोस्ट ला आपण जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अत्यंत नम्रतापूर्वक आभार मानतो.*
           *एवढ्या पोस्ट केल्या पण अजूनही आधार बाबतीत काही मित्र शॉर्ट कट वापरून माहिती भरण्यासाठी प्रयत्न करतात आणि मग त्याचा परिणाम आधार फाईल अपलोड करताना Error येत आहे. म्हणून ही पोस्ट टाकण्याची वेळ आली. पण काही हरकत नाही. खाली देत असलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा आणि येत असलेल्या Error वर मात कराल अशी आशा आहे.*

    *आधार डाउनलोड फाईल भरतांना घ्यायची काळजी*

1)  *सर्वप्रथम 'J' कॉलम सिलेक्ट करून Format cell ची प्रोसेस नीट झाली आहे याची खात्री करा. प्रोसेस नीट झाली नाही तर अंक सलग न दिसता 2.456+ असे दिसतात.*

2) *आधार अंक स्पेस न देता सलग टाईप करा.*

3) *मुलाचे First name आधारकार्डवर उलटे असले तरी तुम्ही सोईचेच लिहा. उदा. More Ganesh असे असेल तरी first name 'Ganesh' लिहा.शिवाय वरील नावात वडिलांचे नाव नाही. मग middle name काही टाकू नका.*

4) *आधारकार्ड वर जन्मतारीख फक्त वर्ष असेल तर अजिबात भरू नका. Blank सोडा.*

5) *प्रत्येक शब्दाचे स्पेलींग्ज आधारकार्ड वर जसे आहे तसे भरा.*

6) *मित्रांनो आपल्याला माहिती भरण्यासाठी जी डाउनलोड फाईल दिली आहे. तिच्या अर्ध्या भागात मुलांची माहिती दिलेली आहे. अनेक मित्रांनी तिच माहिती copy paste केली आणि पुढील कोऱ्या भागात टाकली हा शॉर्टकट वापरल्याने फाईल अपलोड केल्यानंतर mismatch File types असा error आलेला आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत copy paste करू नका. सर्व माहिती टाईप करून भरा. मित्रांनो आपल्याला हे भरायचेच आहे तर काळजी घेतलेली चांगलीच आहे ना.*

7) *जन्मतारीख 16-08-2010 अशीच नोंदवा. 16/08/2010 अशी टाईप करू नका.*

8) *Gender टाईप करू नका. त्या कॉलम मध्ये क्लिक केले की बाजूला एक छोटासा उभा बाण दिसतो त्यावर क्लीक करून निवडा.*

9) *सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे याची खात्री झाली की ती फाईल Save as करायच्या अगोदर नेहमीच्या साध्या पद्धतीने Save करा. बाहेर पडा नि त्या Save केलेल्या फाईल ची copy करून इतर Drive वर आणि pendrive यामध्ये घेऊन ठेवा. याचा उद्देश एकच आहे की नंतर Save as करून csv comma delimited केलेली फाईल अपलोड केल्यानंतर जरी फाईल Error आली तरी दुरूस्ती करण्यासाठी ही दुसरीकडे Save करून ठेवलेली फाईल उपयोगी पडेल. म्हणजेच सर्व माहिती पुन्हा एकदा भरावी लागणार नाही.*

10) *आता मुळ माहिती भरलेली फाईल पुन्हा ओपन करून Save as ची प्रोसेस पुर्ण करून फाईल अपलोड करुन टाका.*

11) *आधार माहिती कोणत्याही लिपी मध्ये भरली तरी चालेल. पण शक्यतो Capital letters मध्ये भरा.*

12) *सर्वात महत्वाची गोष्ट अर्धवट माहिती भरून फाईल Save as करू नका. काही मित्र असे करतात आणि पुन्हा राहिलेली माहिती भरण्यासाठी ती फाईल ओपन करून माहिती भरतात व फाईल अपलोड करतात. अशा वेळी फाईल टाईप आपोआप बदलून Error दाखवला जातो.म्हणून सर्व माहिती भरूनच Save as ची प्रोसेस करा.*

13) *शेवटची आणि महत्वाची गोष्ट csv comma delimited केलेली फाईल पुन्हा ओपन करून पाहू नका. Csv comma delimited केली की ती अपलोड करून टाका.*
*आपल्या आधार कामासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
      🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  राहुरी अ'नगर
      प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
            *मो. नं. 7758074275*
  🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶
धन्यवाद नवाळे सर

सरल प्रणाली

सरल प्रणाली

सरल प्रणाली संदर्भात माहितीसाठी पुढे दिलेल्या link वर click करा..

शाळा पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरणे .Student input pdf file
डाऊनलोड क्लिक करा

शाळा पोर्टलवर शाळेची  माहिती भरणे.School input form pdf file
डाऊनलोड शब्दावर क्लिक करा


शाळा पोर्टलवर शाळेची  माहिती भरणे detail pdf
डाऊनलोड शब्दावर क्लिक करा

शाळा पोर्टलवर  मार्गदर्शिका Saral offline manual in marathi

डाऊनलोड शब्दावर क्लिक करा

सचित्र STUDENT DATA  2016-
डाऊनलोड शब्दावर क्लिक करा

विद्यार्थी  पोर्टलवर आधार कार्ड माहिती भरणे. Aadhar ppt

डाऊनलोड शब्दावर क्लिक करा



विद्यार्थी  पोर्टलवर १ लीच्या विद्यार्थ्यांची माहिती भरणे 1st std

डाऊनलोड शब्दावर क्लिक करा

सरल संस्था नोंदणी मार्गदर्शिका

डाऊनलोड शब्दावर क्लिक करा

सरल संगणक प्रणालीचे फायदे

डाऊनलोड शब्दावर क्लिक करा


स्कूल पोर्टल प्रथम वर्ष 2015--2016
डाऊनलोडशब्दावर क्लिक करा



विद्यार्थी  transfer मार्गदर्शिका.
डाऊनलोड करा शब्दावर क्लिक करा
*सरल महत्वाचे* :
*दिनांक* : *३० सप्टेंबर २०१६*
(अतिमहत्वाची माहिती असल्याने सर्वांना share करावी ही विनंती)

             *student पोर्टल विशेष*

या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी भरलेली माहितीच्या आधारे होणार हे निश्चित झाले होते परंतु अद्याप काही शाळाचे पेंडिंग काम लक्षात घेता आज दिनांक 29 सप्टेंबर २०१६ रोजी *मा.डॉ.श्री सुनील मगर साहेब,अध्यक्ष ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा शिक्षण संचालक बालभारती* यांच्या उपस्थितीत झालेल्या मिटिंग मध्ये ही अंतिम मुदत *दिनांक ७ ऑक्टोंबर २०१६* रोजी पर्यंत सर्व शाळांना वाढवून देण्यात आलेली आहे.दिनांक ७ ऑक्टोंबर २०१६ रोजी मध्यरात्री १२ वाजेनंतर सर्व शाळांचे online माहिती भरण्याची सुविधा बंद करून शाळेच्या अंतिम पटाची माहिती cluster login ला verify करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.तत्पूर्वी सर्व शाळांनी आपली माहिती व्यवस्थितरीत्या भरून पूर्ण करावी.आपण भरलेली माहिती जी *७ ऑक्टोंबर २०१६ ला cluster login ला system द्वारे automatic forward केली जाणार आहे* .दिनांक १ ऑक्टोंबर पासून मुख्याध्यापक login ला संच मान्यता या नावाची tab उपलब्ध करून दिली जाणार आहे यामध्ये आपली कोणती माहिती cluster ला पाठवली जाणार आहे याविषयीचा सविस्तर report दाखवला जाणार आहे.हा report पाहून मुख्याध्यापकाने आपल्या माहितीची खातरजमा करावी आणि कमी जास्त असलेली माहिती update करून घ्यावी.दिनांक ७ ऑक्टोंबर २०१६ रोजी मध्यरात्री सदर माहिती system द्वारे verify करण्यासाठी केंद्रप्रमुखांना verify करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.मुख्याध्यापकांना सदर माहिती cluster लेवल ला forward करण्याची आवशकता नाही,ती माहिती system द्वारे पाठवण्यात येणार आहे.त्यामुळे दिनांक ७ ऑक्टो २०१६ रोजीपर्यंत आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची अचूक माहिती भरून पूर्ण असणे गरजेचे आहे.यामध्ये कोणकोणती माहिती भरून पूर्ण असावी आणि ती कशा रीतीने पूर्ण करावी याबाबत सदर पोस्ट मध्ये सुचना करण्यात येत आहे,तरी सदर पोस्ट सविस्तर रीत्या सर्वांनी वाचावी अशा सुचना देण्यात येत आहे.

                  *New Entry*

*अ) इयत्ता १ ली च्या नविन मुलांची माहिती system ला भरणे* : या वर्षी नव्याने इयत्ता १ ली ला प्रवेश घेतलेला आहे अशा सर्व मुलांची माहिती offline excel शीट द्वारे भरण्याची सुविधा मुख्याध्यापक login ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.मुख्याध्यापकाने सदर माहिती भरताना मुख्याध्यापक login मधून excel या tab मधून download personal या बटनावर क्लिक करून एक excel शीट download करून घ्यावी.आणि सदर शीट मध्ये offline पद्धतीने इयत्ता १ ली च्या सर्व मुलांची माहिती अचूक भरावी.आणि सदर शीट ही .csv(comma delimited) या format मध्ये रुपांतरीत करावी आणि पुन्हा मुख्याध्यापक login मधून excel या tab मधून upload personal या बटनावर क्लिक करून सदर file upload करावी.ही माहिती भरत असताना काही शाळांना नविन तुकडी तयार करण्यासाठीचा error दाखवण्यात येत आहे.ज्या शाळांनी मागील वर्षी तुकडी तयार करून पुन्हा delete केल्या आणि पुन्हा दुसरी तुकडी तयार केली आहे अशा शाळांना सदर error येत आहे.अशा शाळांनी excel या tab मधून download personal या बटनावर क्लिक करून एक excel शीट download करताना त्या सोबत एक word या format मध्ये असणारी read me file download होते ती काळजीपूर्वक वाचावी.या file मध्ये ६० ते ६२ व्या ओळीमध्ये आपल्या शाळेत पुढील प्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे.आपणास सदर माहिती उदाहरणार्थ म्हणून दाखवण्यात येत आहे.ती वाचावी.

Select division number as,

*Stream* : Not Applicable
*Division No.* : 1
*Division* : A
*Medium* : Marathi

अशा प्रकारे आपल्या शाळेत इयत्ता १ ली च्या मुलांची माहिती भरताना stream,division no. , division आणि medium कोणते भरावे हे त्या word format मध्ये असणाऱ्या *read me* या file मध्ये देण्यात आलेले आह.अगदी त्याचप्रमाणे आपण मुलाची माहिती भरताना सदर माहिती भरावी.आणि त्यानंतर .csv format मध्ये सदर file रुपांतरीत करून system ला अपलोड करावी.म्हणजे आपणास वरील error येणार नाही.

काही विद्यार्थी हे मागील वर्षी १ ली होते आणि या वर्षी ते इयत्ता २ री ला आहेत परंतु पालकाने सदर मुलाला जुन्या शाळेतून काढून दुसऱ्या नविन शाळेत दाखल केले आहे परंतु अशा मुलाला त्यांनी नविन शाळेत इयत्ता १ ली च्या वर्गात प्रवेश घेतलेला आहे.अशा मुलांची मागील वर्षी नोंद झालेली असताना नविन शाळा पुन्हा १ ली ला new entry या सुवीधेमधून नोंदवत असल्याचे दिसून येत आहे.अशा शाळांनी हे लक्षात घ्यावे की आपण अशा मुलांची duplicate entry तयार करत आहात.हे योग्य नाही आहे.तरी अशा मुलांच्या बाबतीत अशा नविन शाळांनी जुन्या शाळेस ट्रान्स्फर ची request पाठवावी आणि सदर मुलाला standard updation या बटनावर क्लिक करून इयत्ता २ री तून इयत्ता १ ली करून घ्यावी.जुन्या शाळेतून नविन शाळेने दाखला घेतला नसेल तरी जुन्या शाळेने सदर मुलाला ट्रान्स्फर करन्यास हरकत नाही आहे.परंतु कोणत्याही परिस्थितीत नविन शाळेने कोणत्याही विद्यार्थ्यांची माहिती duplicate होणार नाही याची नोंद घ्यावी.अन्यथा अशी duplicate entry असलेले मुले हे संचमान्यता साठी गृहीत धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
 
*ब) इयत्ता २ ते १२ वी च्या मुलांची जी मुले मागील वर्षी student पोर्टल मध्ये नोंदवली गेली नाही आहे अशा मुलांची माहिती new entry म्हणून भरणे* :
   सन 2015-16 मध्ये आपण सरल मध्ये आपल्या विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे,ही माहिती भरत असताना अनावधानाने काही विद्यार्थ्याची नोंद सरल ला करायची राहून गेलेली आहे.सन 2016-17 या वर्षी फक्त 1 ली च्या नवीन मुलांची माहिती offline पद्धतीने सरल मध्ये नोंदवण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे.परंतु मागील वर्षीचे राहिलेले विद्यार्थी आणि या वर्षी नव्याने दाखल झालेले इतर वर्गातील मुले *(परराज्यातील मुले/ वयानुरूप दाखल मुले/readmission)* या मुलांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आलेली आहे याची नोंद घ्यावी.ही सुविधा beo लॉगिन द्वारे शाळेला उपलब्ध करून दिली आहे.जर आपल्या शाळेत असे विद्यार्थी नोंद करावयाचे राहिले असतील तर आपण आपल्या गटशिक्षणाधिकारी म्हणजेच beo लॉगिन ला विनंती करावी की ही सुविधा आमच्या शाळेला उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी सदर शाळेला ही सुविधा देणे गरजेचे आहे किंवा नाही याची शहानिशा करतील आणि *खात्री करून* ती सुविधा आपल्या लॉगिन मधून उपलब्ध करून देतील,तशी सुविधा beo लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यानंतर ती शाळा त्यांच्याकडे असणाऱ्या कोणत्याही वर्गातील मुलांची माहिती ही online भरू शकतील याची नोंद घ्यावी. *गटशिक्षणाधिकारी आपल्या लॉगिन मधून एका वेळेला केवळ ३० शाळेलाच ही परवानगी देऊ शकत होते परंतु आता अशी मर्यादा १०० पर्यंत वाढवण्यात आलेली आहे* .ज्या शाळेला परवानगी दिली जाईल त्या शाळेला beo यांनी दिलेल्या विहित वेळेत ते काम पूर्ण करावयाचे आहे.किती तारखेपासून किती तारखेपर्यंत ही सुविधा त्या त्या शाळेला असेल हे beo त्या शाळेला परवानगी देताना ठरवू शकतील,तसे option त्यांच्या लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.शाळेला अशी माहिती भरण्यासाठी किती काळ द्यावा हे beo यांनी काळजीपूर्वक ठरवावे जेणेकरून आपल्या कार्यक्षेत्रात सर्व शाळेची माहिती ही *दिनांक ०७ ऑक्टोंबर २०१६* पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावयाची आहे याची गामभीर्याने नोंद घ्यावी.अशा प्रकारे beo यांनी त्वरित या सुविधेचा उपयोग करून आपल्या कार्यक्षेत्रातील अशा शाळांना ही सुविधा शहानिशा करून उपलब्ध करून द्यावी.Beo login मधून सदर काम कसे करायचे याबाबत चे *मराठी मॅन्युअल* आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.कृपया या ब्लॉग ला भेट द्यावी.तसेच या सुविधेचा वापर करून काही शाळा इतर शाळेतून आपल्या शाळेत आलेल्या विद्यार्थ्याना ट्रान्सफर करून न घेता या सुविधेमधून add करत आहे अशा शाळेंना सूचना आहे की अशा पद्धतीने आपण जर विद्यार्थी add करून घेतले तर ते विद्यार्थी सिस्टिम द्वारे यथावकाश काढण्यात येतील.त्यामुळे भविष्यात जर आपले हे विद्यार्थी आपल्या कॅटलॉग ला दिसले नाही तर यासाठी केवळ संबंधितास जबाबदार धरले जाईल याची गाम्भीर्याने नोंद घ्यावी तसेच असे विद्यार्थी संच मान्यतेसाठी गृहीत धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी.आपण भरलेल्या प्रत्येक मुलाचे verification होणार आहे याची नोंद घ्यावी.

*महत्वाचे* : आपल्या शाळेला आलेली विद्यार्थी ट्रान्स्फर request ही approve करणे हे सर्व शाळांवर बंधनकारक आहे.जर एखाद्या मुलासाठी ज्या शाळेने request पाठवायला हवी परंतु त्या ऐवजी दुसऱ्याच शाळेने request पाठवली असेल तर सदर विद्यार्थी जोपर्यंत approve अथवा reject होत नाही तोपर्यंत कोणत्याही शाळेस अशा विद्यार्थ्यांसाठी request पाठवण्यासाठी दिसत नव्हता.अशा वेळी नविन शाळेला असे वाटत होते की सदर विद्यार्थ्याची मागील वर्षी नोंद झालेली नाही आहे तरी आपण या विद्यार्थ्यांची new entry म्हणून नोंद करून घ्यावी.असे वाटणे सहाजिक आहे हे लक्षात घेऊन आता अशा केस मध्ये एक नविन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.जर एखाद्या शाळेने आपल्या आधी student ट्रान्स्फर ची request पाठवली असेल तरी तो विद्यार्थी आता इतर शालेना देखील दिसून येईल.त्या विद्यार्थ्याला इतर कोणत्या शाळेने request पाठवली आहे हे देखील दिसेल.अशा मुलाच्या बाबतीत त्यांच्या गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक यांची संपर्क माहिती आपणास दाखवण्यात येणार आहे जेणेकरून आपण सदर गटशिक्षणाधिकारी याना संपर्क करून सदर request ही reject करण्यास सांगु शकाल जेणेकरून request पाठवण्याकरता सदर विद्यार्थी त्याच्या नविन शाळेस उपलब्ध होऊ शकेल.

तसेच कालपासून सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या login मध्ये student search करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या मधून student सरल id असलेले विद्यार्थी परंतु student पोर्टल मध्ये दिसत नसलेले विद्यार्थी शोधता येतील.

      *३)विद्यार्थी out of school करणे*

      मागील वर्षी student पोर्टलमध्ये नोंद केलेले आपल्या शाळेतील मुले काही कारणास्तव शाळा सोडून गेले आहेत आणि अशा मुलांना त्या वर्गाच्या पटामधून कमी करणे गरजेचे आहे यासाठी एक नविन सुविधा म्हणजेच त्या विद्यार्थ्याला out of school करण्याची सुविधा student पोर्टल मध्ये मुख्याध्यापक login मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.यासाठी खालील माहिती वाचा.

सर्वप्रथम आपल्या शाळेचे login करावे आणि maintenance tab मधील update standard data या बटनावर क्लिक करावे.यानंतर दिसून येणाऱ्या Type या tab मधील out of school हा पर्याय निवडावा आणि select reason मध्ये  विद्यार्थ्याला आपण आपल्या शाळेतून म्हणजेच या वर्षी लागणाऱ्या संच मान्यतेसाठीच्या विद्यार्थी संख्येमधून कमी करण्यासाठी ज्या कारणामुळे कमी करणार आहोत ते कारण select करावे.
सदर कारणामध्ये खालील कारणांचा समावेश करण्यात आलेला आहे.

*Absent Since Long Period* : असे विद्यार्थी जे बऱ्याच दिवसापासून शाळेत येत नाही.(कायम गैरहजर)

*Couldn’t Continue Higher Education* : पुढील शिक्षण पूर्ण करू शकला नाही आणि शाळा सोडून गेला आहे असे विद्यार्थी.

*Died* : मयत विद्यार्थी.

*Don’t Have Higher Standard And Not Requested For Transfer* : शिक्षणासाठी पुढील वर्ग उपलब्ध नाही आणि इतर शाळेत शिकण्यास गेला नाही किंवा नवीन शाळेत शिकण्यास गेला आहे पण नविन शाळेची ट्रान्स्फर ची विनंती आलेली नाही असे विद्यार्थी.

*Not Required Transfer* : विद्यार्थी ट्रान्स्फर ची आवशकता नसलेले विद्यार्थी.

*10th Fail* : १० वी इयत्ता अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

*12th Fail* : १२ वी इयत्ता अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

*12th pass* : १२ वी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी.

select reason मध्ये वरील योग्य कारणाचा पर्याय निवडावा आणि त्या समोर असलेल्या Enter Remark या बटनासमोर असलेल्या रकान्यात शक्य असेल तर शेरा (remark) लिहावा.

यानंतर आपणास ज्या विद्यार्थ्याला कमी करावयाचे आहे अशा विद्यार्थ्याला शोधावयाचे आहे.तो विद्यार्थी शोधण्यासाठी आपण दिलेल्या कोणत्याही पर्यायाचा वापर करू शकाल.अशा विद्यार्थ्यास शक्य तो त्याच्या standard निहाय शोधणे योग्य असते. यामध्ये शैक्षणिक वर्ष,इयत्ता,शाखा आणि तुकडी या बटनासमोर आपणास लागू असलेला पर्याय निवडा आणि शेवटी असलेल्या submit  बटनावर क्लिक करा.शेवटी असलेल्या submit  बटनावर क्लिक केल्यावर विद्यार्थी यादी  उपलब्ध होते.ज्या विद्यार्थ्याला आपणास कमी करावयाचे आहे अशा विद्यार्थ्यास आपण select करून घ्यावे.विद्यार्थ्यास select केल्यावर शेवटी असणाऱ्या submit बटनावर क्लिक करावे.त्यानंतर विद्यार्थी त्या तुकडीमधून out of school केलेला आहे अशा अर्थाची सुचना पहावयास मिळेल.म्हणजेच विद्यार्थ्यास out of school करण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असे समजावे.

आता सदर विद्यार्थी आपल्या शाळेच्या सन २०१६-१७ च्या कॅटलॉग  मध्ये दिसून येणार नाही हे लक्षात घ्यावे.विद्यार्थी out of school केला म्हणजे system मधून कायमचा delete केलेला आहे असे समजणे चुकीचे आहे.out of school केलेले विद्यार्थी हे फक्त या वर्षीच्या संचमाण्यतेसाठी गृहीत धरण्यात येणार नाही आहे.असे विद्यार्थी पुन्हा शाळेत आणण्यासाठी शाळेने प्रयत्न करावयाचे आहेत.तसेच सदर मुलांची यादी ही सर्व login ला दाखवण्यात येणार आहे.
महत्वाचे : चुकून एखादा विद्यार्थी हा out of school झालेला असेल तर त्या विद्यार्थ्याला पुन्हा त्याच शाळेत घेता येईल.तसेच out of school   केलेले विद्यार्थी इतर शाळेला ट्रान्सफर साठी उपलब्ध असतील हे लक्षात घ्यावे.
तसेच विद्यार्थ्याला out of school कसे करावे याबाबत whatsapp वर बऱ्याच वेगवेगळ्या पोस्ट share होताना दिसत आहेत.सदर माहिती ही केवळ समजुतीचा घोटाळा आहे. *काही post मध्ये विद्यार्थ्याला notknown तुकडीत update केल्याने विद्यार्थी out of school करता येईल असे सांगण्यात आलेले आहे जे पूर्णपणे चुकीचे आहे* .तरी सर्वांना सूचित करण्यात येत आहे की अशा कोणत्याही पद्धतीने विद्यार्थी out of school करू नये.आणि जर या चुकीच्या माहितीच्या आधारे जर यापूर्वीच आपण सदर विद्यार्थी out of school केला असेल तर तर आता वरती सांगितलेल्या पद्धतीने विद्यार्थ्यास out of school करावे.अधिकृत सुचना आणि post व्यतिरीक्त कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नये अशा सुचना या post द्वारे देण्यात येत आहे.

महत्वाचे : out of school चे काम कसे करावे हे समजून घेण्यासाठी कृपया आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या. अथवा out of school चे manual mobile मध्ये download करून घेण्यासाठी पुढील लिंक ला क्लीक करा.
*लिंक* :  https://goo.gl/ZnYYRR

                     *४)प्रमोशन*

इयत्ता १ ते ८ चे system द्वारे *ऑटो प्रमोशन* आणि इयत्ता ९ ते १२ चे मुख्याध्यापकाने करावयाचे *manual प्रमोशन* या दोन प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन होणे अपेक्षित होते.परंतु हे प्रमोशन होत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे प्रमोशन होऊ शकले नाही त्यासाठी प्रमोशन मध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहे,हे बदल समजून घ्यावेत.

अ) इयत्ता १ ते ८ चे ऑटो प्रमोशन केल्यावर देखील काही मुलांचे प्रमोशन अद्याप झालेले नाही अशा मुलांचे प्रमोशन होऊ न शकल्याने सदर मुले हे कॅटलॉग मध्ये सं २०१५-१६ ला दिसत आहे.त्यामुळे सन २०१६-१७ च्या होणाऱ्या संच मान्यतेसाठी सदर मुलांना system गृहीत धरणार नाही त्यासाठी या मुलांना सन २०१६-१७ या वर्षीच्या कॅटलॉग मध्ये घेऊन जाणे गरजेचे आहे हे लक्षात घ्यावे.ही मुले २०१६-१७ च्या कॅटलॉग मध्ये कसे घेऊन जावे यासाठी पुढील केस चा विचार करून काम करावे.

*जर विद्यार्थी सध्या आहे त्याच वर्गात दिसत असेल म्हणजेच योग्य वर्गात दिसत असेल परंतु २०१५-१६ च्या कॅटलॉगला दिसत असेल तर अशा मुलांना आपण प्रमोशन या सुविधेचा उपयोग करून पुढील वर्गात घेऊन जावे.अशा रीतीने तो विद्यार्थी आता सं २०१६-१७ च्या कॅटलॉग मध्ये दिसेल परंतु तो विद्यार्थी त्याच्या आहे त्या वर्गापेक्षा पुढील वर्गात दिसून येईल.त्यासाठी मुख्याध्यापक login ला असलेल्या standard change या बटनाचा वापर करून आपण सदर मुलास पुन्हा आहे त्या वर्गात घेऊन येऊ शकाल.
या ठीकानी एक बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे की student प्रमोशन मध्ये विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष बदलते परंतु student ट्रान्स्फर मध्ये आणि standard अपडेशन मध्ये मात्र शैक्षणिक वर्ष बदलत नाही याची नोंद घ्यावी*

*जर विद्यार्थी २०१६-१७ च्या कॅटलॉग ला दिसत आहे परंतु मागील वर्गात आहे अशा मुलांना आपण standard अपडेशन या सुविधेद्वारेच पुढील वर्गात घेऊन जावे.अशा केस मध्ये student प्रमोशन करू नये.अशी मुले आपणास प्रमोशन मध्ये दिसणार नाही* .

*जर विद्यार्थी २०१६-१७ च्या कॅटलॉग ला दिसत आहे परंतु खऱ्या वर्गापेक्षा पुढील वर्गात दिसत आहे अशा मुलांना आपण standard अपडेशन या सुविधेद्वारेच मागील वर्गात घेऊन यावे* .

*महत्वाचे* : जे विद्यार्थी आपणास २०१५-१६ च्या कॅटलॉग मध्ये दिसत आहे परंतु आता ते विद्यार्थी manual प्रमोशन करताना मात्र दिसत नाही असे फार थोडे विद्यार्थी आहेत असे दिसत आहे.फक्त अशा केस मधील विद्यार्थी आपण आम्हाला त्वरीत कळवावे.यासाठी आपण idreambest@gmail.com या आय डी वर email करू शकाल.आपली समस्या सोडवण्यात येईल अन्यथा या  http://goo.gl/9vBAQ8  लिंक वर क्लिक करा आणि आम्हाला आपली समस्या कळवा.ती दूर केली जाईल.

ब) इयत्ता ९ ते १२ वीच्या manual प्रमोशन मध्ये प्रमोशन करताना काही शाळांनी इयत्ता १० वीचे प्रमोशन ११ वी ला करताना same school ला करण्याऐवजी चुकून different school ला केले आहे आणि आता ते मुले त्याच शाळेत same school ला हवी आहेत अशा केस मध्ये ही मुले त्या शाळेला दिसत नाही.अशा केस मध्ये बऱ्याच शाळा इतर शाळांना ही मुले ट्रान्स्फर करतात आणि पुन्हा आपल्या शाळांना परत ट्रान्स्फर करून मुलांना आपल्या शाळेत आणतात.कारण different school ला प्रमोट केलेली मुले ही जरी त्या शाळेला दिसत नसतील तरी इतर शाळांना ही मुले ट्रान्स्फर साठी दिसतात.ही प्रोसेस पूर्णपणे चुकीची आहे हे लक्षात घ्यावे.अशा मुलांना पुन्हा आपल्या शाळेत दाखवण्यासाठी येत्या दोन दिवसात आपणास नविन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे,त्या द्वारे आपण सदर मुलांना आपल्या शाळेत दाखवू शकाल याची नोंद घ्यावी.

१० वी आणि १२ वी चे विद्यार्थी जर प्रमोशन करून देखील त्याच वर्गात दिसत असेल तर असे विद्यार्थी वरील email id वर मेल द्वारे कळवा अन्यथा या http://goo.gl/9vBAQ8  लिंक वर क्लिक करा आणि आम्हाला आपली समस्या कळवा.ती दूर केली जाईल.

            *५) Student Transfer*

विद्यार्थी जर एका शाळेतून दुसऱ्या शाळेत शिकण्यासाठी गेला असेल तर नविन शाळेने जुन्या शाळेस student पोर्टल मध्ये त्या विद्यार्थ्याची भरलेली माहिती online ट्रान्स्फर करण्यासाठी request पाठवावी.सदर request जुनी शाळा खात्री करून approve करेल.त्यानंतर ट्रान्स्फर झालेली सदर मुलाची माहिती ही नविन शाळा update करेल आणि सदर विद्यार्थी ट्रान्स्फर करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
परंतु या प्रोसेस मध्ये खालील प्रकारच्या केस दिसून येत आहे.

 *नविन शाळांनी जुन्या शाळेस request न पाठवणे* :

या केस मध्ये जुन्या शाळेच्या पटावर तो मुलगा दिसून येत आहे पण खर आर तो मुलगा शिकण्यासाठी इतर शाळेमध्ये गेलेला आहे.अशा जुन्या शाळांनी सदर मुलगा maintanance  या tab मध्ये जाऊन update standard data या tab चा वापर करून सदर मुलास out of school करून घ्यावे.अशाने सदर मुलगा आपल्या कॅटलॉग मध्ये दिसणार नाही आणि जेंव्हा नविन शाळा त्या विद्यार्थ्याची ट्रान्स्फर साठी request करेल तेंव्हा या मुलांना जुन्या शाळेच्या मुख्याध्यापकाने ट्रान्स्फर करावे.  out of school कसे करावे हे जाणून घेण्यासाठी या post मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहेच.तसेच अधिक आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या तेथे या विषयीचे manual उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

*ट्रान्स्फर साठी आलेली request approve न करणे* :

काही शाळा अद्याप देखील आपल्या शाळेस आलेल्या request या approve करत नाही असे दिसते.अशा केस कारण नसताना नविन शाळेस विद्यार्थी आपल्या कॅटलॉग ला दिसत नाही आहे.त्यामुळे आपल्या संच मान्यतेसाठी सदर विद्यार्थी येईल की नाही अशी भीती या शाळांना वाटत आहे.परंतु नविन शाळेने अशा बाबतीत अजिबात न गोंधळता संयमाने घ्यावे.बऱ्याच शाळा अशा मुलांना new entry द्वारे नोंद करून duplication करत आहे.हे योग्य नाही आहे.एकत्र ज्या शाळा आपल्याला आलेल्या request approve करत नाही आहे अशा मुख्याध्यापकाला आणि त्या शाळेच्या गटशिक्षणाधिकारी यांना यासाठी जबाबदार धरण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.तरी सर्व शाळांनी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी आपणास आलेल्या सर्व request त्वरीत approve कराव्यात अशा सूचना मा.डॉ.मगर साहेब,अध्यक्ष ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य यांच्याकडून परवा झालेल्या व्ही सी मध्ये दिलेल्या आहेत.

*विद्यार्थी ट्रान्स्फर होऊन आलेला आहे परंतु नविन शाळांनी तो विद्यार्थी अद्याप update केलेला नाही आहे* :

या केस मध्ये जुन्या शाळेने विद्यार्थी request approve केलेली आहे परंतु नविन शाळेने सदर मुलास अद्याप update केलेले नाही आहे.जोपर्यंत ट्रान्स्फर झालेला मुलगा update केला जात नाही तोपर्यंत मुलगा हा कॅटलॉग ला दिसनार नाही याची नोंद घ्यावी.असे लाखो विद्यार्थी अद्याप update करावयाचे बाकी आहे हे student पोर्टल च्या dash बोर्ड वरील आकड्यावरून समजते.तरी सर्व मुख्याध्यापकांनी आपली ही मुले update करून घ्यावी.मुलाना update कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या तेथे या विषयीचे manual उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

*चुकीच्या ट्रान्स्फर request करणे/approve करणे* :

 काही शाळांनी चुकीच्या मुलांच्या ट्रान्स्फर request केलेल्या आहेत त्या गटशिक्षणाधिकारी यांनी त्वरीत reject करून देणे गरजेचे आहे.कारण जोपर्यंत सदर ट्रान्स्फर request reject होत नाही तोपर्यत इतर शाळांना तो मुलगा ट्रान्स्फर request साठी लिस्ट मध्ये दिसून येत नाही.अशा वेळी नविन शाळांना असे वाटणे सहाजिक आहे की सदर विद्यार्थी हा मागील वर्षी नोंदवला गेला नाही आहे.अशा केस मध्ये मग नविन शाळा या विद्यार्थ्याला new entry मधून नोंदवत आहे. अशाने विद्यार्थ्यांचे dulpication वाढत असल्याचे दिसत आहे.यासाठी आता एका शाळेने ट्रान्स्फर request केली असले तर इतर शाळांना देखील तो मुलगा दिसेल अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.सदर मुलास कोणत्या शाळेने ट्रान्स्फर request केलेली आहे त्या शालांचे आणि त्या शाळेच्या गटशिक्षणाधिकारी यांचे डिटेल देखील दाखवण्यात येणार आहे.त्याना संपर्क करून सदर ट्रान्स्फर request reject करण्यास सांगावे आणि मुलाला आपण ट्रान्स्फर करून घ्यावे.कोणत्याही परिएथितीत मुलाच्या नोंदी दुबार होऊ नये ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे लक्षात घ्यावे.

*ट्रान्स्फर request केलेली मुले जुन्या शाळेने approve केली आहे परंतु update ला नविन शाळेला न दिसणे* .:

अशा केस मध्ये जुनी शाळा बऱ्याचदा असे म्हणते की आम्ही ट्रान्स्फर request approve केलेली आहे परंतु प्रत्यक्षात मात्र तसे केलेले नसते.यासाठी आधी खात्री करून घ्यावी की जुन्या शाळेने आपण पाठवलेले ट्रान्स्फर request approve केले आहे की नाही.यासाठी आपल्याच login ला आपण ट्रान्स्फर request status या tab चा वापर करून  सदर बाबीची खातरजमा करू शकतो.आणि खरोखर असे झाले असेल तर कृपया  http://goo.gl/9vBAQ8   या लिंक ला क्लिक करा आणि आम्हाला डिटेल कळवा.आपली समस्या सोडवण्यात येईल.

*६) जनरल रजिस्टर चुकून create  झाल्याबाबत* :

बऱ्याच शाळांनी माहिती भरत असताना आपणास लागू नसताना जनरल रजिस्टर create केले आहे.त्यामुळे पूर्वी येत असणारे entire रजिस्टर न येता नविन create केलेले रजिस्टर येत आहे असे दिसून येत आहे.अशा वेळी पुन्हा चुकून केलेले रजिस्टर delete करता येत नाही.आणि नविन मुले upadate करताना समस्या येत आहे.तरी अशा शाळाना सुचना आहे की जर आपले जनरल रजिस्टर वेगळेच दिसत असले तरी त्या रजिस्टर ला select करून आपल्या शाळेतील मुलांना update करून घ्यावे.कॅटलॉग आणि संच मान्यता साठी ही सर्व मुले गृहीत धरली जाणार आहेत.तसेच सदर जनरल रजिस्टर दुरुस्थ/update करण्याची सुविधा देखील लवकरच दिली जाणार आहे.त्यामुळे गोंधळून न जाता आपले काम सुरु ठेवावे.

*७) Exceptions या नविन tab विषयी* .:

आपल्या शाळेतील मागील वर्षीचा रेकॉर्ड पाहता या वर्षी ज्या प्रोसेस होणे गरजेचे होते परंतु काही कारणास्तव प्रमोशन सारख्या प्रोसेस अद्याप झालेल्या नाही आहे अशा मुलांची आकडेवारी आणि सविस्तर माहती या tab मध्ये देण्यात आलेली आहे म्हणजेच आपली पेंडिंग कामे आपणास दाखवण्यात आलेली आहे.ही माहिती पाहून आपण आपली कामे पूरम करून घ्यावी.

*student पोर्टल बद्दल काही समस्या असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा आणि आपली समस्या सविस्तर मांडा.आपली समस्या सोडवण्यात येईल.*
लिंक : http://goo.gl/9vBAQ8

आमच्या राज्यस्तरीय सरल whatsapp ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा किंवा havelieducation.blogspot.in   या ब्लॉग ला भेट द्या तेथे उपलब्ध करून दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि आमच्या ग्रुपचे सदस्य व्हा.या ग्रुपवर सरल संदर्भात update माहिती मिळेल आणि आपल्या समस्या थेट आमच्यापर्यंत पोहचतील.

राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी *लिंक* :  
https://goo.gl/6CiLy0

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in

We learn English

We learn English डाऊनलोड करा .नवाळे सर धन्यवाद

Monday, 5 September 2016

गुगल ड्राईव्ह चा वापर

Google Drive चा वापर



चला,तंत्रज्ञान शिकूया

गूगल ड्राईव्ह

प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये Google Drive इनबिल्ट च आहे. परंतु बरेच जण या गूगल सेवेचा वापर करत नाहीत. आज आपण Drive विषयी माहिती घेऊयात.
 

 
 हे एक ऑनलाइन स्टोरेंज असून यात  15 gb पर्यंत डाटा सेव्ह करता येतो. ते ही पूर्णपणे मोफत.या पुढील स्टोरेज साठी रक्कम भरून अधिक स्टोरेज वाढवता येते.
 
 या मध्ये आपल्याला सर्व प्रकारचे Documents,  PDF फाईल्स, GR, images, Video, Audio किंवा इतर महत्वपूर्ण माहिती upload करून कायम सेव्ह/जतन करता येते व त्याची लिंक इतरांना share करता येते.
 

 
ड्राईव्ह App कसे वापरावे?
 

 
प्रथम ड्राईव्ह ओपन करून आपला email व पासवर्ड इन्सर्ट करून sign   इन करून घ्यावे लागेल.
 
आता फाईल्स अपलोड करण्यासाठी प्रथम ड्राईव्ह ओपन केल्यानंतर + या चिन्हावर टच करा व create फोल्डर वर टच करून आपण अपलोड करत असलेल्या विषय माहिती शी निगडित फोल्डर ला नाव द्या.
 

 
तयार केलेल्या फोल्डर मध्ये documents व इतर बाबी अपलोड करण्यासाठी पुन्हा + या चिन्हावर टच करा व upload वर टच करून मोबाईल स्टोरेज मधील हवी ती माहिती सिलेक्ट करा व upload करा. आपली माहिती अपलोड होईन ड्राईव्ह मध्ये सेव्ह होईल.
 

 
एकवेळ अपलोड केलेली  माहिती,documents मोबाईल मधून डिलिट केली/झाली तरी ड्राईव्ह वर कायम सेव्ह राहील. हव्या त्या वेळी डाऊनलोड करू शकता.
------------------------------------------------------------------------------
 

 
लिंक कशी द्यायची? 

 
ड्राईव्ह मध्ये अपलोड केलेल्या ppt/pdf/video /audio  फाईलला डायरेक्ट लिंक कशी द्यायची हे आपण आता पाहणार आहे. ..
 

 
1)यासाठी प्रथम तुम्हाला drive मधील ज्या document/file ची लिंक द्यायची आहे , ती फाईल निवडा.
 

 
2)उजव्या बाजूला वर्तुळात i असलेल्या चिन्हावर टच करा.
 

 
 3)टच केल्यावर जे पेज ओपन होते..त्या पेजच्या खाली  who has access च्या ठिकाणी लिंक बटणवर टच करा.ते हिरवे होईल तो पर्यंत wait करा.म्हणजेच public होईल म्हणजेच ही लिंक  कोणालाही डाऊनलोड करण्यासाठी तयार होते.(इतरांना डाउनलोड साठी लिंक share करायची असेल तर ही प्रक्रिया महत्वपूर्ण आहे)*
 

 
4)त्यानंतर त्याच पेजवरील सर्वात वर share link बटणवर टच करा.
 

 
5) टच केल्यावर अनेक ऑप्शन येतील,त्यातील Copy to clipboard या ऑप्शन ला टच करा लिंक काॅपी होईल.
 

 
अशा प्रकारे लिंक तयार करून इतरांना share करता येईल.
--------------------------------------------------------------------------
 

 
डायरेक्ट डाऊनलोड लिंक कशी तयार करायची..?
 

 
एखादी लिंक ओपन केली तर फाइल ओपन होते व मग पुन्हा आपल्याला डाउनलोड चिन्हावर  टच करून फाइल डाउनलोड करून घ्यावी लागते. आणि जर लिंक टच करून डायरेक्ट डाउनलोड चालू झाले तर...?
 
त्या साठी direct लिंक द्यावी लागेल.
 
ड्राईव्ह मधील ppt/pdf/video /audio  फाईलला डायरेक्ट लिंक कशी द्यायची हे आपण आता पाहणार आहे.
 

 
1) वरील प्रमाणे ड्राईव्ह वरील फाइल ची लिंक copy करा.
 

 
2)Copy केलेली लिंक
 
ही तुमची त्या डाक्युमेंटची महत्वाची  लिंक आहे. डायरेक्ट  लिंक बनवण्यासाठी कोणत्याही browser मध्ये खालील
 
https://sites.google.com/site/gdocs2direct/


हा वेब अड्रेस टाकून सर्च करा.
 

 
3)आता Direct link Generater असे पेज ओपन होईल.त्या पेजवरील enter your sharing url च्या  ठिकाणी गुगल ड्राईव्ह ची वरील  लिंक Copy  केलेली आहे, ती पेस्ट करा..
 

 
 4)पेस्ट केल्यावर त्याच्या खाली create direct link बटणवर टच करा लगेच त्याच्या खालील चौकटीत  डायरेक्ट लिंक तयार होईल. .*
 

 
 5)खाली  तयार झालेली लिंक शेअर करा. .. डाक्युमेंट डायरेक्ट डाऊनलोड चालू होईल.
 

 
टीप:- कोणत्याही फाइल ची direct लिंक होईल परंतू फोल्डर ची डायरेक्ट लिंक होणार नाही.

------------------------------------------------------------------------------
 

 
लिंक short कशी करायची?
 

 
वरील प्रकारे तयार केलेली लिंक खूप मोठी असेल,ती  टाईप करन्यास सोपी नसणार. मग ती लिंक शॉर्ट/लहान पण करता येते.
 
 लिंक short करण्यासाठी दोन पर्याय आहेत.
 

 
1) browser वरून
 

 
कोणत्याही browser मध्ये https://goo.gl हा अड्रेस टाका, Google Url Shortner नावाचे पेज ओपन होईल.
 

 
यात तुमची कॉपी केलेली लिंक टाका. व create short link वर टच करा ती छोटी  होईल...
 
तेथून copy करून  शेअर करा..
 
(वापरात असलेला browser ही आपल्या ई-मेल ने sign in केलेला हवा, नसेल तर करून घ्या.)
 

 
2)URL shortner Android App
 

 
App ओपन करा, ई-मेल ने sign in करून घ्या.
 
 आपण ड्राईव्ह मधून कॉपी केलेली लिंक इथं इन्सर्ट करा.ok टच करा,क्षणार्धातच लिंक शॉर्ट होईल, इथून पुन्हा कॉपी करा व share करा.
 

Friday, 2 September 2016

स्व निर्मित cartoon Tables 2 to 20

कार्टुन सह 2 to 10 tables   मुलांच्या आवाजातील पाढे
कार्टुन सह 11 to 20 tables  हसत खेळत पाढे पाठांतरासाठी पाढयांवर क्लिक करा

आकारिक मूल्यमापन चाचणी १

आकारिक मूल्यमापन चाचणी १- १ली ते ४थी प्रश्नपत्रिका PDFडाऊनलोड करा

ब्लॉग तयार करणे

ब्लॉग तयार करा

ब्लॉग तयार करायला शिका



          आज सर्वच शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. तुमच्या शाळेतील या उपक्रमांची माहिती इतरही शाळांना व्हावी यासाठी आज सोशल मिडियाचा सर्वात जास्त्‍ा वापर केला जात आहे. 
            तुम्हालाही तुमच्या शाळेचे इंटरनेटवर एक स्वतंञ संकेतस्थ्‍ळ तयार करायचे असल्यास याठिकाणी ब्लॉग कसा तयार करावा ? या विषयी सविस्त्‍र माहिती देण्यात येत आहे. तिचा वापर करुन आपण आपल्या  शाळेचा ब्लॉग , वेबसाईट तयार करु शकता. काही अडचण आल्यास 9403589853, 9922017031 या क्रमांकावर कॉल करा. आपली अडचण निश्चितच सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न्‍ा केला जाईल. चला तर मग आता शिकूया ब्लॉग , वेबसाईट कशा प्रकारे बनवावी.
1.  सर्व प्रथम आपण Gmail वर आपले ई-मेल खाते तयार करावे.
2.   त्यांनंतर www.blogger.com ही वेबसाईट ओपन करुन त्यात आपल्या ई-मेल अकाऊंटने लॉगिन करावे.
3.  लॉगिन केल्यानंतर खालील पेज ओपन होईल. यात New Blog वर क्लिक करावे.

 4.    खालील विंडो मध्ये Blog Tittle टाईप्‍ा करावे. 
     
    तुमच्या ब्लॉगचा इंटरनेटवर address काय ठेवायचा आहे तो          Address या रकान्यात टाईप करावा.
         जसे – www.mahazpschool.blogspot.in
          Template  यामध्ये तुमच्या ब्लॉगला कशा प्रकारचे Background हवे असेल ते खाली दिलेल्या डिझाईन मधून Select करावे. व खालील Create Blog वर क्लिक करावे.
5.  आता आपला ब्लॉग तयार झालेला आहे. व खालील विंडो दिसेल. View Blog वर क्लिक केल्यास तुम्हाला तुमचा ब्लॉग दिसेल.

6.   खाली दिलेल्या विडोंमध्ये  View Blog शेजारील पाँइंटवर क्लिक केल्यास आपणास  Post, Pages, Layout, Templates, Setting यासारख्या अनेक ऑपशन दिसतील त्या वापरुन तुम्ही तुमचा ब्लॉग सजवू शकता.

7.   आपण तयार केलेल्या ब्लॉगचे आपणास जर वेबसाईटमध्ये रुपांतर करायचे असल्यास आपण ते करु शकता माञ त्यासाठी वार्षिक काही रक्कम आपणास भरावी लागेल.

PPT तयार करणे

PPT बनवूया

संगणकावर PPT कशी बनवावी ?

1) प्रथम MS Office ओपन करुन power point ओपन  करा.


2) तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल .स्लाईड डिझाइनचि हवी असल्यास स्क्रीनवर Design या option वर क्लिक करा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील त्यातील एक निवडा .


3)स्लाईडवर 2 text box दिसतील.पहिल्या बाॅक्समध्ये तुमच्या स्लाईड शो चा विषय व दुसर्या बाॅक्समध्ये तुमचे नाव टाका.


4) बाॅक्स नको असेल तर बाॅक्सच्या रेषेवर राईट क्लिक करुन कट करा .


5)आता तुम्हाला स्लाईडवर फोटो टाकायचा असल्यास वरिल Insert वर क्लिक करा picture option दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली insert क्लिक करा फोटो स्लाईडवर येईल.


6)फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वर insert ला क्लिक करा त्यात text box व word art सिलेक्ट करा व त्यात टाईप करा नंतर text box लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा.


7) आता आपण साऊंड देऊ
आता डाव्या बाजूला स्लाईड नं 1 वर या आपण जे विषयाचे नाव लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर insert वर जाऊन sound वर क्लिक करा अथवा नावाखाली अॅरो वर क्लिक करा तेथे काही options येतील त्यातून 2 नंबरचे  option निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे तो साऊंड निवडा व क्लिक करा
अशा प्रकारे तुम्ही स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकता.


8) आता आपण अॅनिमेशन देऊ
यासाठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट करा नंतर वर Animations वर क्लिक करा त्याखाली डावीकडे Custom animation असे option दिसेल त्यावर क्लिक करा आता  उजव्या बाजुला add efect असे option दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4 options येतिल त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेक options दिसतील त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 options दिसतील start,Direction,speed यातील प्रत्येक सिलेक्ट करुन सेट  करा.अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टला  अॅनिमेशन द्या अशा
  प्रकारे अनेक स्लाईड तयार करा.
      

यानंतर आपण स्लाईडला Animation देऊ
वर animation ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर अनेक स्लाईड दिसतील त्यापैकी एक निवडा  (जवळपास 60 आहेत)त्याच्याच शेजारी Transition sound व speed असे दोन options दिसतील त्या दोन्हीतील हवे  ते transition निवडा त्याखालीच Apply to all असे option दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते transition लागू होईल.

स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल
सरावाने आपण चांगल्या ppt बनवू शकता
अशा प्रकारे आपण आपला स्लाईड शो (ppt) तयार करु शकता.

 


Thursday, 1 September 2016

गुगल फॉर्म तयार करणे

गुगल फॉर्म तयार करणेमाहिती जलदरित्या जमा होवून त्याचे 
संकलनही सहजरित्या होईल. 
   यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला
 पाहिजे असलेल्या माहीतीसाठीचा गुगल 
फॉर्म तयार करता आला पाहिजे. आज
 आपण याठिकाणी गुगल फॉर्म कशा प्रकारे 
तयार करायचा हे शिकणार आहोत. 

1.   गुगलफॉर्म तयार करण्यासाठी सर्वांत 
महत्त्वाचे म्हणजे आपले G-mail ला खाते 
असले पाहिजे.

2.  युजर आय डी व पासवर्डच्या मदतीने 
G- mail खाते Login करावे.

          


G- mail अकाउंट उघडल्यानंतर लाल बाणाने 
हदाखविल्या प्रमाणे Google Drive  वर क्लिक 
करावे. त्यानंतर खालील इमेज मध्ये 
दाखविल्या प्रमाणे Google Drive ओपन 
होईल.

3. Google Drive ओपन झाल्यानंतर New  
वर क्लिक करावे . त्यानंतर More मधील 
Google Form वर क्लिक करावे

        


4.  खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे 
Form Tittle मध्ये फॉर्मचा विषय टाईप करावा. 
याठिकाणी पाठयपुस्तकांची मागणी हा विषय 
टाईप केला आहे.




5. खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे  फॉर्म
 मध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या मुदद्या 
प्रमाणे माहिती Edit  करावी. इमेज मध्ये बाणाने
 दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत. व शेवटी 
Done वर क्लिक करावे.


6. वरील प्रमाणे इयत्ता 1ली ते  4 थी पर्यंतच्या
 वर्गांची माहिती त्यात भरावी.




      वरील इमेज मध्ये दाखविल्या बाणाने 
दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत व शेवटी 
Send form  वर क्लिक करावे. 


7. Send Form वर क्लिक केल्यानंतर खालील 
विंडो ओपन होईल. Link to Share या खाली
 आपल्या गुगल फॉर्मची लिंकची तयार होईल. ती
 Copy करुन ठेवावी.   त्यानंतर  Done  वर 
क्लिक करावे.


8.  त्यानंतर खालील इमेज मध्ये दाखविल्या 
प्रमाणे आपला गुगल फॉर्म तयार होईल. त्यात 
आपण आपल्याला पाहिजे असणारी माहिती 
इतरांकडून भरुन घेवू शकतो. त्यासाठी आपण 
Copy केलेली लिंक वेबसाईट, ब्लॉग, व्हॉटस 
अप, फेसबुक, ईमेल ने इतरांकडे पाठवू शकतो.
 इतरांकडून माहिती भरुन घेवू शकतो. जमा 
झालेली माहिती आपणास संंकलन होवून  
Excel फॉरमॅट मध्ये मिळते.



9. खाली दाखविलेल्या Insert Tab चा वापर 
करुन आपण आपल्या गुगल फॉर्म आकर्षक 
डिझाइन करु शकतो. 



           अशा प्रकारे गुगल फॉर्म ने माहीतीगोळा 
करुन त्याचे संकलन केल्यास आपले काम जलद 
होवून आपले कार्यालयीन बहुतेक कामे पेपरलेस 
होतील  व मोठया प्रमाणात कागदाची बचत 
होवून पर्यावरणाची हाणी टाळता येईल.